Agriculture News Maharashtra Uncategorized उमरखेड यवतमाळ जिल्हा

कुरळीच्या भोजनगर तांडा येथे विज पडून एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

 

उमरखेड : दडी मारलेल्या पावसाने अचानक मंगळवारी हजेरी लावली, निसर्गाच्या लहरीपणाचा तांडव उमरखेड तालुक्यातील कुरळी येथील, भोजनगर तांडा येथे समोर आला. शेतात काम करीत असताना, अचानक वीज पडून एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाला तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची, हृदयद्रावक घटना, २३ जूनच्या दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

 

महेश गणेश आडे (२४) असे जागीच दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे तर, गंभीर जखमी काळू कनीराम पवार ( ७० ) रा दोघेही भोजनगर तांडा, अशी नावे आहेत. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत महेश यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तर या घटनेतील मुतक महेश सोबत असलेले, काळू कनीराम पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी काळू पवार यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने घटनेची तात्काळ दखल घेतली असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, तहसीलदार राजेश सुरडकर यांनी दिली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.