उमरखेड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची संकल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात राबवली. ते केवळ बोलके सुधारक नव्हते, तर समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणणारे ‘कर्ते सुधारक’ होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत तथा राष्ट्रीय क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ मडावी यांनी केले.
उमरखेड येथे २६ जूनला, स्थानिक जिजाऊ भवन येथे पार पडलेल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य व्याख्यान व अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड संतोष जैन साहेब यांनी भूषवले होते. विविध संघटनांचा संयुक्त पुढाकार आणि मान्यवरांची उपस्थिती, या गरिमापूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, बिरसा क्रांती दल, शेतकरी कष्टकरी संघ , राष्ट्रीय किसान मोर्चा आणि शाहू महाराज स्मारक समिती, उमरखेड यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले होते. विचारपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून, सेवानिवृत्त प्राचार्य वि ना कदम, अभाअनिस यवतमाळचे अध्यक्ष प्रा काशिनाथ लाहोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश कदम, शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष देवानंद मोरे, सुधाकरराव वानखेडे, बिरसा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्षडी बी अंबुरे, विनोद काळे, व्ही डी कोवे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उमरखेड परिसरातील बहुजन समाजातील विविध जाती-जमातींचे नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन चक्रधर पाटील देवसरकर यांनी तर आभार उत्तम बरवड यांनी मानले.











Add Comment